सातारा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन महिला जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
सातारा : सातारा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन महिला जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अश्विनी कैलास माने वय 29, रा. सातारा ही महिला मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील मतकर कॉलनीत पायी चालत जात असताना त्यांना दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झाल्या. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसर्या घटनेत, जगुबाई ज्ञानदेव चव्हाण वय 70, रा. शिवथर, ता. सातारा ही महिला तेथेच पायी चालत जात असताना दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झाल्या. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


