maharashtra

जिल्ह्यातील चार घटनांमध्ये वेगवेगळ्या कारणाने चौघांचा मृत्यू


Four deaths due to different reasons in four incidents in the district
जिल्ह्यात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळ्या कारणाने चौघांचा मृत्यू  झाला आहे.

सातारा : जिल्ह्यात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळ्या कारणाने चौघांचा मृत्यू  झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ज्योतिबा सदु मोहिते वय 75, रा. मंगळवार पेठ, सातारा हे दि. 29 जानेवारी 2022 रोजी जिमनवाडी, ता. पाटण येथे शेतामध्ये काम करत होते. काम करत असताना त्यांना सर्पदंश झाल्याने  त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
दुसर्‍या घटनेत, दि.2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 9.30 वाजण्याच्या सुमारास अश्विनी किशोर धोडंवड वय 21 , रा. कोडोली, ता. सातारा यांनी राहत्या घरी गळफास लावून घेतल्याचे त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
तिसर्‍या घटनेत, कोडोली ता. सातारा येथील राहत असलेली विवाहिता अश्विनी धोंडवड हिच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली होती. दि. 2 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तिने राहत्या घरी ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. तिला नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तिच्या मुत्यूच्या कारणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
चौथ्या घटनेत, दि. 2 रोजी 6.30 वाजण्याच्या सुमारास म्हसवे गावच्या हद्दीत करंजे येथे असलेल्या पुलाजवळील कॉनॉलमध्ये पडून अनुसया गार्डे यांचा मृत्यू झाला. याचा अधिक तपास पोलीस हवालदार कदम करत आहेत.