फलटण तालुक्यातील एका गावात राहणार्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच गावच्या पोलीस पाटलावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : फलटण तालुक्यातील एका गावात राहणार्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच गावच्या पोलीस पाटलावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव (रा. राजुरी ता. फलटण) याने त्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिला थांबवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यानंतर पोलीस पाटील बागाव याने त्याच दिवशी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मुलीस घराचे बाहेर बोलवून त्याने पुन्हा लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व तू जर कोणास काही सांगितले तर तुझ्या घरातील लोकांना जिवे मारुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलीने पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव याच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस पाटील बागाव विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सपोनी अक्षय सोनवणे करीत आहेत.


