Satara

esahas.com

केस पांढरे का होतात, काय आहे त्यामागचं नेमकं कारण? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीतील इरविंग मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्येबाबत संशोधन केलं. ज्यामध्ये अनेक चकित करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. अकाली केस पांढरे होण्याची कारणं ही अनेक असू शकतात. या रिपोर्टनुसार, केसांसाठी आवश्यक पोषक तत्त्वांची शरीरातील कमतरता, धूम्रपान, आजार, एखाद्या प्रकारचा मानसिक धक्का आणि आजकालच्या काळात वाढलेला ताण यासारखी अनेक कारणं आहेत.

esahas.com

Cancer ला आता घाबरण्याची गरज नाही!

रुग्णांच्या हाडामध्ये छेद करून हा बॉल शरीरात सोडला जाईल. मॅग्नेटिक बॉल शरीरात पोहोचल्यानंतर त्याला ट्रॅक केलं जाईल.  एमआरआय मशीन या बॉलला गरम करेल. या प्रक्रियेला 45 सेकंद लागतील. हा बॉल ट्युमर्सपर्यंत पोहोचवला जाईल आणि नंतर एक धमाका होईल. यामुळे ट्युमर्स कमकुवत होतील आणि निरोगी पेशींवर त्याचा परिणाम होणार नाही. या मॅग्नेटिक बॉलचे अंश शरीरातून बाहेर निघतात. या संपूर्ण प्रक्रियेला 30 मिनिटं लागतात.

esahas.com

पोक्सो अंतर्गत लिपिक रामदास गाडे याला दहा वर्ष सक्तमजुरी

नामांकित विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या रामदास पोपट गाडे (वय 33, रा. लाखानगर वाई) याने आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन इयत्ता १० मध्ये शिकणार्‍या १५ वर्षीय शाळकरी मुलाला महाविद्यालयाचे काम आहे, असे सांगून तू जर आला नाहीस तर तुला नापास करीन, तुझे प्रेमसंबंध आहेत असे सांगून बदनामी करण्याची धमकी देत मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याने त्याच्यावर पोक्सोअंतर्गत जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

esahas.com

अल्पवयीन युवतीवर मामाचा बलात्कार

अभ्यास घेण्याच्या बहाण्याने पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मामाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार वाई पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मामाला पोलिसांनी अटक केली आहे. वाई तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या एका गावात हि घटना घडली.

esahas.com

पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; सहाजण गंभीर

पुणे- बंगळूर महामार्गावर सातारा शहराजवळ शेंद्रे गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

esahas.com

रेठरे खुर्दमध्ये हार्वेस्टर मशीनखाली सापडून शेतकर्‍याचा मृत्यू

रेठरे खुर्द, ता. कराड येथे हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने ऊसतोड सुरु असताना मशीनखाली सापडून शेतकर्‍याचा मृत्यू झाला. गुरुवारी 3 रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ऊसतोड सुरू असताना ऊसाच्या कांड्या गोळा करताना ही घटना घडली. संभाजी शंकर पाटील (वय 45) रा. रेठरे खुर्द ता. कराड असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

esahas.com

कराडात धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील चेन लांबवली  

येथील आझाद चौकात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धूमस्टाईल महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन लांबवली. गुरुवारी ३ रोजी दुपारी ही घटना घडली. दुचाकीवरून आलेला चोरटा नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्याआधारे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

esahas.com

भांडणे सोडवायला गेलेल्या महिलेस मारहाण

पती व पत्नी यांच्यामध्ये सुरू असलेली भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या आशा महेश गुरव (वय 41 रा. करंजेनाका सातारा) यांना मारहाण केल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

रस्त्याने जाण्यास अडवणूक केल्याने दोन गटात मारामारी

वाढे, ता. सातारा या गावात राहत असलेले प्रमोद रामचंद्र नलवडे (वय 51) हे रस्त्याने जात असताना याच गावातील नलवडे कुटुंबातील सदस्यांनी अडवणूक करून मारहाण केल्याने परस्पर विरोधी तक्रारी तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

esahas.com

केवायसी अपडेट करतो असे भासवून दीड लाखाची फसवणूक

केवायसी अपडेट करून देतो, असे भासवत अज्ञात चोरट्याने सिकंदर बाबुलाल मुलाणी (वय 34, मुळ रा. वडी ता. खटाव) यांच्या खात्यातून वेळोवेळी रक्कम काढून दीड लाखांची फसवणूक केली आहे. अशा ऑनलाईन फसवणूकीच्या घटना वाढल्या असून वारंवार पोलीसांकडून आवाहन करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.