अभ्यास घेण्याच्या बहाण्याने पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मामाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार वाई पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मामाला पोलिसांनी अटक केली आहे. वाई तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या एका गावात हि घटना घडली.
वाई : अभ्यास घेण्याच्या बहाण्याने पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मामाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार वाई पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मामाला पोलिसांनी अटक केली आहे. वाई तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या एका गावात हि घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उशिरापर्यंत अभ्यास घेण्याच्या बहाण्याने पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी आलेल्या मामाने फिर्यादीच्या घरात झोपलेला असताना मध्यरात्री इच्छा नसताना आक्टोबर महिन्यात जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच घडलेली घटना कोणाला सांगू नकोस अशी धमकी दिली. त्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये फिर्यादीचे घरी जाऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.
संबंधित मुलीस त्रास होऊ लागल्यावर नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी मामाला गावातून ताब्यात घेतले. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे करत आहेत.


