रेठरे खुर्दमध्ये हार्वेस्टर मशीनखाली सापडून शेतकर्याचा मृत्यू
ऊसाच्या कांड्या गोळा करताना दुर्घटना
रेठरे खुर्द, ता. कराड येथे हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने ऊसतोड सुरु असताना मशीनखाली सापडून शेतकर्याचा मृत्यू झाला. गुरुवारी 3 रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ऊसतोड सुरू असताना ऊसाच्या कांड्या गोळा करताना ही घटना घडली. संभाजी शंकर पाटील (वय 45) रा. रेठरे खुर्द ता. कराड असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकर्याचे नाव आहे.
कराड : रेठरे खुर्द, ता. कराड येथे हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने ऊसतोड सुरु असताना मशीनखाली सापडून शेतकर्याचा मृत्यू झाला. गुरुवारी 3 रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ऊसतोड सुरू असताना ऊसाच्या कांड्या गोळा करताना ही घटना घडली. संभाजी शंकर पाटील (वय 45) रा. रेठरे खुर्द ता. कराड असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकर्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रेठरे खुर्द येथील संभाजी पाटील या शेतकर्याच्या ऊसाला तोड आली होती. हारवेस्टर मशीनच्या माध्यमातून ऊसतोड सुरू असताना गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ऊसतोड सुरू असताना मशिनच्या पाठीमागे पडलेल्या ऊसाच्या कांड्या गोळा करण्याचे काम संभाजी पाटील करत होते. कांड्या गोळा करताना पाटील हे ऊसाच्या पाल्यावर पाय घसरून पडले. मात्र, हार्वेस्टर मशीन उंच असल्यामुळे त्यावरील चालकाला याचा अंदाज न आल्याने पाटील हे हार्वेस्टर मशीनखाली सापडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर शिवारातील शेतकर्यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


