health

केस पांढरे का होतात, काय आहे त्यामागचं नेमकं कारण? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

केस पांढरे होणं ही समस्या तर आहेच. पण केस नेमके पांढरे का होतात (White Hair Problem), हे जाणण्यासाठी केसांची संरचना समजून घेतली पाहिजे.

 Why do hair turn white, what is the real reason behind it? The answer given by the experts
न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीतील इरविंग मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्येबाबत संशोधन केलं. ज्यामध्ये अनेक चकित करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. अकाली केस पांढरे होण्याची कारणं ही अनेक असू शकतात. या रिपोर्टनुसार, केसांसाठी आवश्यक पोषक तत्त्वांची शरीरातील कमतरता, धूम्रपान, आजार, एखाद्या प्रकारचा मानसिक धक्का आणि आजकालच्या काळात वाढलेला ताण यासारखी अनेक कारणं आहेत.

काळेभोर आणि घनदाट केस सगळ्यांनाच आवडतात. पण केसांच्या बाबतीत प्रत्येकजण नशीबवान असतोच, असं नाही. आजकाल तर शाळेत असतानाच अनेक मुलांचे केस अकाली पांढरे (Premature Grey Hair) झाल्याचं निदर्शनास येतं. एकेकाळी म्हातारपणी केस पांढरे व्हायचे पण आता वर सांगितल्याप्रमाणे केसांच्या समस्याही बदलल्या आहेत. ज्यामागे आहार, प्रदूषण आणि इतर गोष्टी असल्याचं म्हटलं जातं. पण नेमक केस पांढरं व्हायचं खरं कारण काय आहे आणि त्यावर वैज्ञानिकांचं काय म्हणणं आहे.

अकाली केस पांढरे होणं ही समस्या तर गंभीर आहेच. पण केस नेमके पांढरे का होतात (White Hair Problem), हे जाणण्यासाठी केसांची संरचना समजून घेतली पाहिजे. सायन्स फोकस रिपोर्टनुसार केसांचा काळा रंग हा एका विशिष्ट घटकांमुळे असतो. या घटकाचं नाव आहे मेलनिन. मेलनिन हे एक प्रकारचं रंगद्रव्य आहे ज्यामुळे केसांना काळा रंग मिळतो. या घटकाच्या कमी जास्त प्रमाणाचा फरकाने केसांचा रंग बदलतो. आश्चर्याची बाब म्हणजे माणसांप्रमाणेच जनावरांमध्येही केसांच्या मेलनिनचा नियम लागू होतो. वरील रिपोर्टनुसार, आपल्या केसांच्या मुळांशी मिलेनोसाईट्स नावाच्या कोशिका असतात. ज्यांच्याद्वारे मेलनिनची निर्मिती केली जाते आणि केसात सोडले जाते. ज्यामुळे आपले केस काळे दिसतात.

पण जसजसं आपलं वय वाढतं. तसतसं या कोशिकाही वृद्ध होतात. परिणामी, मेलनिन निर्मितीचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे केस पांढरे (White Hair) होण्यास सुरूवात होते. पण वृद्धापकाळात केस पांढरे होण्याचं चित्र हे पूर्वी दिसायचं आता तर फार कमी वयात केस पांढरे होतात. मग यामागील नेमकं कारण काय आहे?

न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीतील इरविंग मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्येबाबत संशोधन केलं. ज्यामध्ये अनेक चकित करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. अकाली केस पांढरे होण्याची कारणं ही अनेक असू शकतात. या रिपोर्टनुसार, केसांसाठी आवश्यक पोषक तत्त्वांची शरीरातील कमतरता, धूम्रपान, आजार, एखाद्या प्रकारचा मानसिक धक्का आणि आजकालच्या काळात वाढलेला ताण यासारखी अनेक कारणं आहेत.

पण संशोधनकर्त्यांनुसार ताण (Stress) हे केस पांढरे होण्यामागील सर्वात मोठं कारण आहे. अभ्यासात हे निदर्शनास आलं आहे. या अभ्यासात समोर आलेल्या परिणामांनी वैज्ञानिकही चकित झाले आहेत. या अभ्यासात जेव्हा लोकांच्या मनावरचा ताण कमी झाला तेव्हा त्यांचे केस पुन्हा काळे होऊ लागल्याचं दिसून आलं. या संशोधनानुसार ताण हा आपल्या केसांच्या रंगावर परिणाम करतो, याचे पुरावेही गोळा करण्यात आले आहेत.

साहजिकपणे आज आपली जीवनशैली (Lifestyle) बदलली आहे. ज्याचा परिणाम आपल्या केसांवरही होत आहे. त्यामुळे पांढऱ्या केसांची समस्या असल्यास आपल्या जीवनशैलीत बदल करा आणि ताण घेऊ नका. ताणविरहीत राहिलात तर केसही काळे राहतील.