सातारा पालिकेच्या हद्दवाढीतील भागात सोयी सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने ४८ कोटी ५० लाख रूपये इतके अनुदान उपलब्ध करावे, अशी मागणी सातारा विकास आघाडीचे नेते व खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यातील शासकिय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते.
दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ज्येष्ठ गायिका यांना या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला कोविड-19 साठी पॉझिटिव्ह चाचणी झाल्यानंतर आणि त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाल्याने त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 28 जानेवारीच्या सुमारास तिला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले, जेव्हा तिच्यामध्ये थोडीशी सुधारणा दिसून आली. मात्र, ५ फेब्रुवारीला लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडली आणि त्या पुन्हा व्हेंटिलेटरवर होत्या.
टाटा हॅरियर सध्या फक्त डिझेल इंजिनसह येते. हॅरियर आणि सफारीमध्ये वापरण्यासाठी टाटा नवीन पेट्रोल इंजिनवर काम करत आहे. पेट्रोल इंजिनमुळे टाटाला सुरुवातीची किंमत कमी करण्यास मदत होईल. ग्राहकाच्या दृष्टिकोनातून, कमी धावणाऱ्या खरेदीदारांसाठी ते अधिक चांगले होईल. तसेच, आगामी उत्सर्जन नियमांमुळे डिझेल इंजिन महाग होतील. XUV700 वर 2.0-लिटर पेट्रोल इंजिन घेणे इष्ट आहे.
सातारा येथील एका कंपनीच्या तीन संचालकांनी १९ कोटी ३९ लाख ५९ हजार २९३ रुपयांची शासकीय कराची रक्कम शासकीय तिजोरीत न भरल्याने त्यांच्या विरोधात राज्यकर उपायुक्तांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वानवडी, पुणे येथील जिंदाल कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
वर्ये, ता. तालुका सातारा गावच्या हद्दीत अज्ञात इसमाने एसटीच्या काचेवर दगड मारल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अज्ञात इसमावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यात दोन वेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी २ हजार ४० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
बेलवडे खुर्द, ता. पाटण गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपयांची तांब्याची तार चोरुन नेल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ७ हजार २८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
येथील मारूतीबुवा कराडकर मठासमोरच वाईन विक्रीवरून वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी काल साताऱ्यात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस जोडे मारण्याचे आंदोलन झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व वारकऱ्यांतर्फे झालेल्या निषेधात कराडकरांच्या मठासमोरच बंडातात्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.