maharashtra

हद्दवाढीच्या विकासासाठी 48 कोटी रुपयांची मागणी

खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट

Demand of Rs. 48 crore for development of boundary
सातारा पालिकेच्या हद्दवाढीतील भागात सोयी सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने ४८ कोटी ५० लाख रूपये इतके अनुदान उपलब्ध करावे, अशी मागणी सातारा विकास आघाडीचे नेते व खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यातील शासकिय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते.

सातारा : सातारा पालिकेच्या हद्दवाढीतील भागात सोयी सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने ४८ कोटी ५० लाख रूपये इतके अनुदान उपलब्ध करावे, अशी मागणी सातारा विकास आघाडीचे नेते व खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यातील शासकिय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते.
खासदार उदयनराजे भोसले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वैरत्व सर्वांनाच माहिती आहे. पण, आज सातारा पालिकेच्या विकास कामांच्या निमित्ताने खासदार उदयनराजेंनी पुण्यातील शासकिय विश्रामगृहातील व्हीव्हीआयपी सुटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांना सातारा पालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागाच्या विकासासाठी ४८ कोटी ५० लाख रूपयांचे अनुदान राज्य सरकारने द्यावे, अशी मागणी केली.
याबाबतचे निवेदनही त्यांनी पवार यांना दिले. या निवेदनात उदयनराजेंनी म्हटले की, सातारा पालिकेच्या हद्दवाढीमुळे सध्याच्या तिप्पट भागाचा समावेश झालेला आहे. ६० हजार ३७३ इतक्या लोकसंख्येचा यामध्ये समावेश झालेला आहे. या वाढीव लोकसंख्येला पायाभूत सुविधा पुरवणे सातारा पालिकेला शक्य नाही. त्यामुळे नव्याने पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या या भागात सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून अनुदान दिले जाते. त्यासाठी सातारा पालिकेस ४८ कोटी ५० लाख रूपयांचे अनुदान उपलब्ध करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.