येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० ते २ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीसमोर संतोष पांडुरंग शिंदे (पूर्ण पत्ता माहीत नाही), सुरेश सर्जेराव कदम रा. खेड, ता. सातारा यांनी कंपनीच्या गेट समोर सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान आरडाओरडा करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलीस नाईक राहुल खाडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.


