maharashtra

कराडात बंडातात्या कराडकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध


In Karad, they protested by slapping the image of the Bandatatya Karadkar
येथील मारूतीबुवा कराडकर मठासमोरच वाईन विक्रीवरून वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी काल साताऱ्यात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस जोडे मारण्याचे आंदोलन झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व वारकऱ्यांतर्फे झालेल्या निषेधात कराडकरांच्या मठासमोरच बंडातात्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

कराड : येथील मारूतीबुवा कराडकर मठासमोरच वाईन विक्रीवरून वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी काल साताऱ्यात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस जोडे मारण्याचे आंदोलन झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व वारकऱ्यांतर्फे झालेल्या निषेधात कराडकरांच्या मठासमोरच बंडातात्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, रणजित पाटील यांच्यासह वारकरी उपस्थित होते. बंडातात्यांच्या वक्तव्याचा राज्यभरात निषेध नोंदवला जात आहे. कराडात मारूतीबुवा कराडकर मठाच्या पायरीवर आंदोलन झाले. यावेळी बंडातात्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. उपस्थितांनी बंडातात्यांची प्रतिमा आणली होती. त्यालाही जोडे मारले. यावेळी बंडातात्यांचा निषेध असो, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी बंडातात्या यांचे खरे नाव घेवूनही त्यांच्या निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बटाणे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. बटाणे म्हणाले, कराडला वारकरी सांप्ररदायाची मोठी परंपरा आहे. मात्र, बंडातात्या यांच्या वक्तव्याने त्याला डाग लागला आहे. शासनाच्या निर्णयावर वक्तव्यावर सुप्रिया सुळे, पंकजाताई मुंढे व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र यांच्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. बंडातात्या वारकरी आहेत, त्यांच्या तोंडात ते शब्द शोभत नाही. कराडकर मठाला दिडशे वर्षाची परंपरा आहे. याच मठात बंडातात्या लहानाचे मोठे झाले. येथील भगवानमामा यांच्या हाताखाली ते शिकले. मात्र, आता ते सारे विसरले आहेत. वास्तविक त्यांनी सांप्रदायावर बोलायला हवे होते, मात्र, ते राजकीय नेत्यांवर बोलले. ते चुकीचे आहे. स्वतःला राजकीय झोतात व प्रसिद्धीस आणण्यासाठी त्यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांचा राष्ट्रवादीतर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.