बेलवडे खुर्द, ता. पाटण गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपयांची तांब्याची तार चोरुन नेल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : बेलवडे खुर्द, ता. पाटण गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपयांची तांब्याची तार चोरुन नेल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २४ जानेवारी २०२२ ते दि. १ फेब्रुवारी दरम्यानबेलवडे खुर्द, ता. पाटण गावच्या हद्दीत असणाऱ्या तुळशी नदी पाथरा जवळून अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपयांची तांब्याची तार चोरुन नेल्याची तक्रार संदीप लालासो देशमुख यांनी पाटण पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.


