maharashtra

जिल्ह्यात चार दारु अड्डयावर छापे


Raids on four liquor dens in the district
जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ७ हजार २८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

सातारा : जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ७ हजार २८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मलटण, ता. फलटण येथील जिंती नाका परिसरात कॅनॉल जवळ झुडपाच्या आडोशाला तेथीलच जनार्दन सिताराम पवार याच्याकडून ५०० रुपये, पुसेगाव ता. खटाव गावच्या हद्दीत पुसेगाव - दहिवडी जाणाऱ्या मार्गावर एका हॉटेलच्या आडोशाला दिगंबर अण्णा माने रा, जामदार वाडा, पुसेगाव याच्याकडून २ हजार ४६० रुपये, वाई, ता. वाई येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या खाली रस्त्याच्या कडेला प्रदीप संपत सपकाळ रा. आकोशी, ता. वाई याच्याकडून १ हजार ४४० रुपये, बावधन नाका, ता. वाई येथे वजन काटाच्या समोर रस्त्याच्या कडेला सोमनाथ कृष्णा खरे रा. किकली याच्याकडून २ हजार ८८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.