वर्ये, ता. तालुका सातारा गावच्या हद्दीत अज्ञात इसमाने एसटीच्या काचेवर दगड मारल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अज्ञात इसमावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : वर्ये, ता. तालुका सातारा गावच्या हद्दीत अज्ञात इसमाने एसटीच्या काचेवर दगड मारल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अज्ञात इसमावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २ फेब्रुवारी रोजी ८.१० वाजण्याच्या सुमारास विशाल नारायण लोखंडे, रा. कामाठीपुरा, सातारा हे एसटी बस क्रमांक एमएच २० बीएल ४२७१ घेऊन पुणे येथून सातारकडे येत असताना वर्ये, ता. तालुका सातारा गावच्या हद्दीत लाकडाच्या वखारीच्या जवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने एसटीच्या समोरील काचेवर दगड मारून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


