health

Cancer ला आता घाबरण्याची गरज नाही!

फक्त एका बॉलने Cancer क्लीन बोल्ड; 33 दिवसांतच खात्मा

Cancer No More Fear!
रुग्णांच्या हाडामध्ये छेद करून हा बॉल शरीरात सोडला जाईल. मॅग्नेटिक बॉल शरीरात पोहोचल्यानंतर त्याला ट्रॅक केलं जाईल.  एमआरआय मशीन या बॉलला गरम करेल. या प्रक्रियेला 45 सेकंद लागतील. हा बॉल ट्युमर्सपर्यंत पोहोचवला जाईल आणि नंतर एक धमाका होईल. यामुळे ट्युमर्स कमकुवत होतील आणि निरोगी पेशींवर त्याचा परिणाम होणार नाही. या मॅग्नेटिक बॉलचे अंश शरीरातून बाहेर निघतात. या संपूर्ण प्रक्रियेला 30 मिनिटं लागतात.

लंडन :

 कॅन्सर (World Cancer day 2022) म्हटलं की अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. कॅन्सर जितका महाभंयकर आजार तितकेच त्याच्यावरील उपचारही वेदनादायी आहेत. किती तरी दिवस कॅन्सरवर उपचार होतात, पण यावेळी कॅन्सर पेशींसह निरोगी पेशींवरही परिणाम होतो आणि त्याच्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. पण आता निरोगी पेशींना हानी न पोहोचता कॅन्सरला नष्ट करण्यासाठी एक खास बॉल  (Magnetic balls )  तयार करण्यात आलं आहे. जो 33 दिवसांतच कॅन्सरचा खात्मा करतो.कॅन्सर ट्युमर्समध्ये (Cancer tumours) मॅग्नेटिक बॉल्सचा धमाका करून त्यांना नष्ट केलं जाईल. मॅग्नेटिक बॉल आणि एमआरआय मशीनच्या मदतीने हे उपचार केले जातील. आतापर्यंत एमआरआय मशीन कॅन्सरचं निदान करण्यासाठी वापरला जायचा पण आता उपचारातही त्याचा उपयोग होणार आहे. रुग्णांच्या हाडामध्ये छेद करून हा बॉल शरीरात सोडला जाईल. मॅग्नेटिक बॉल शरीरात पोहोचल्यानंतर त्याला ट्रॅक केलं जाईल.  एमआरआय मशीन या बॉलला गरम करेल. या प्रक्रियेला 45 सेकंद लागतील. हा बॉल ट्युमर्सपर्यंत पोहोचवला जाईल आणि नंतर एक धमाका होईल. यामुळे ट्युमर्स कमकुवत होतील आणि निरोगी पेशींवर त्याचा परिणाम होणार नाही. या मॅग्नेटिक बॉलचे अंश शरीरातून बाहेर निघतात. या संपूर्ण प्रक्रियेला 30 मिनिटं लागतात.
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार संधोकांनी कॅन्सरवरील या अनोख्या उपचाराचा प्रयोग कॅन्सरग्रस्त उंदारवर केला, जो यशस्वी ठरला. 33 दिवसांत उंददारीतल कॅन्सर ट्युमर नष्ट झाला. डुकरावरही याचा प्रयोग करण्यात आला. हे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता मॅग्नेटिक बॉल्समुळे माणसांवर उपचार करण्याची आशा वाढली आहे. लवकरच प्रोस्टेट कॅन्सर असलेल्या रुग्णांवर याचा प्रयोग केला जाणार आहे
युनिव्हर्सिटी कॉलेच लंडनमधील संशोधक मार्क लिथगोए यांनी सांगितलं कि, स्थानिक रुग्णालयात एमआरआय मशीन असतात. या मशीनमार्फतच कॅन्सरची चाचणी आणि उपचार दोन्ही होईल.

कॅन्सर म्हणजे काय? त्याला कसं रोखायचं, लक्षणे आणि त्यावर उपचार करण्याचे योग्य मार्ग जाणून घ्या

जगभरातील लोक दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) साजरा करतात. कर्करोग हा प्राणघातक आजार असल्याचे आपण सर्वजण जाणतो. त्यामुळे कॅन्सरच्या नावाने लोकांमध्ये एक वेगळीच भीती दिसून येते. कर्करोगाविषयी लोकांना जागरुक करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलने (UICC) देखील हा दिवस जागतिक एकत्रीकरण उपक्रम (global uniting initiative) म्हणून घोषित केला आहे. या दिवसाच्या निमित्ताने कॅन्सर विषयी तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या.

कर्करोग हा एक असा प्राणघातक आजार आहे, ज्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात असामान्य पेशी तयार होऊ लागतात. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास या पेशी सतत वाढत राहतात आणि शरीरात असंतुलित पद्धतीने विभागत राहतात. हा कर्करोग शरीरातील ऊतींचाही नाश करतो. साधारणपणे आपल्या शरीरातील पेशी नियंत्रित पद्धतीने वाढतात आणि विभाजित होतात. जेव्हा सामान्य पेशी खराब होतात किंवा वृद्ध होतात तेव्हा त्या मरतात आणि त्यांच्या जागी निरोगी पेशी येतात. कर्करोगाच्या पेशी वाढतच राहतात आणि जेव्हा त्या थांबल्या पाहिजे तेव्हा त्यांची संख्या वाढते. दुसऱ्या शब्दांत कर्करोगाच्या पेशी निरोगी पेशींप्रमाणेच नियमांचे पालन करत नाहीत

कर्करोगाची कारणं

धूम्रपान, तंबाखू, शारीरिक हालचालींचा अभाव, अयोग्य आहार, क्ष-किरण, सूर्यापासून येणारे अतिनील किरण, संसर्ग यांसारखी कारणे आहेत.

कर्करोगाची लक्षणे काय आहेत?

शरीराच्या कोणत्याही भागात दीर्घकाळापर्यंत वेदना.

दीर्घकाळापर्यंत खोकला

लघवीशी संबंधित समस्या

कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे हे देखील एक लक्षण आहे.

जागतिक कर्करोग दिन का साजरा केला जातो?

हा दिवस 1933 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यामागचा उद्देश हा आहे की लोकांना या आजाराविषयी माहिती मिळावी आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपायांची माहितीही दिली जावी.

या दिवशी UICC ने काही इतर कर्करोग सोसायट्या, उपचार केंद्रे आणि संशोधन संस्थांच्या मदतीने याचे आयोजन केले होते.

जागतिक कर्करोग दिन 2022 ची थीम

यावर्षी जागतिक कर्करोग दिन "केअर गॅप बंद करा" (Close The Care Gap ) या थीमसह साजरा केला जाईल. ही मुळात अनेक वर्षांची मोहीम आहे. ज्याचा उद्देश एवढाच की अधिकाधिक लोकांना कॅन्सरबद्दल जागरुकता मिळावी.

जागतिक कर्करोग दिनाचे उद्दिष्ट:

जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा उद्देश समाजात कर्करोगाविषयी जागरूकता वाढवणे आणि या आजाराबाबत लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे हा आहे. जेव्हा लोक जागरूक होतील, तेव्हा रोग आणि मृत्यूचे प्रमाण कमी करणे खूप सोपे होईल.