maharashtra

भांडणे सोडवायला गेलेल्या महिलेस मारहाण


The woman who went to settle the quarrel was beaten
पती व पत्नी यांच्यामध्ये सुरू असलेली भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या आशा महेश गुरव (वय 41 रा. करंजेनाका सातारा) यांना मारहाण केल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : पती व पत्नी यांच्यामध्ये सुरू असलेली भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या आशा महेश गुरव (वय 41 रा. करंजेनाका सातारा) यांना मारहाण केल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरीतील गेंडामाळ येथे राहत असलेले शाहूराज संभाजी जाधव (वय 24) व त्यांची पत्नी यांच्या दि. 2 रोजी 8.45 वाजण्याच्या सुमारास भांडणे सूरू होती. शाहूराज हे पत्नीला मारहाण करत होते. यावेळी ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या आशा गुरव यांना शाहूराज याने मारहाण करून जखमी केले आहे. यामुळे शाहूराज याच्या विरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.