येथील आझाद चौकात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धूमस्टाईल महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन लांबवली. गुरुवारी ३ रोजी दुपारी ही घटना घडली. दुचाकीवरून आलेला चोरटा नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्याआधारे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
कराड : येथील आझाद चौकात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धूमस्टाईल महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन लांबवली. गुरुवारी ३ रोजी दुपारी ही घटना घडली. दुचाकीवरून आलेला चोरटा नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्याआधारे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, शहरातील आझाद चौकापासून सात शहीद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एक महिला चालत निघाली होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या एकाने धूमस्टाईल त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून पोबारा केला. ही घटना घडताच संबंधित महिलेसह नागरिकांनी आरडाओरडा केला. परंतु, तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. यानंतर तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची दाखल होत नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. त्यामध्ये पोलिसांना संशयित दूचाकीस्वार दिसून आल्याची माहिरी समोर आली आहे. त्यानुसार पोलीस दूचाकीस्वाराचा शोध घेत असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झाली नव्हती.


