maharashtra

जिल्हादंडाधिकारी यांचे कोविड-१९ बाबत सुधारित आदेश


Revised order of District Magistrate regarding Kovid-19
सातारा जिल्हयासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी कोविड-१९ बाबत सुधारित आदेश पारीत केले आहेत.

सातारा : सातारा जिल्हयासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी कोविड-१९ बाबत सुधारित आदेश पारीत केले आहेत.
दिनांक 02/02/2022 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालील बाबींचा समावेश करीत आहे.
1) सर्व राष्ट्रीय उद्याने आणि सफारी नियमित  तसेच ऑनलाईन तिकीट बुकींग घेऊन वेळेनुसार खुले राहतील.  या क्रियाकलापांच्या नियंत्रण अधिका-यांनी  सदर वेळेत उपस्थित व्यक्तींची संख्या सुनिश्चित करावी व कोविड 19 अनुरुप वर्तनाचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सदर ठिकाणी सर्व अभ्यागतांचे पूर्णपणे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.  
2) सातारा  जिल्हयामधील  प्रेक्षणीय स्थळे  नियमित तसेच ऑनलाईन तिकीट बुकींग घेऊन वेळेनुसार खुले राहतील.  या क्रियाकलापांच्या नियंत्रण अधिका-यांनी  सदर वेळेत उपस्थित व्यक्तींची संख्या सुनिश्चित करावी व कोविड 19 अनुरुप वर्तनाचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सदर ठिकाणी सर्व अभ्यागतांचे पूर्णपणे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.  
3) ब्युटी सलून आणि हेअर कटिंग सलूनसाठी  या कार्यालयामार्फत दि.09/01/2021 व 10/01/2022 रोजी लागू केलेल्या समान निर्बंधांच्या अधीनराहून   स्पा  50% क्षमतेसह चालू ठेवणेस परवानगी देणेत येत आहे.  
4)  अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नसेल परंतु कोविड 19 च्या अनुषंगाने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
5)  निश्चित केलेल्या वेळेनुसार  उद्याने व बागा खुली ठेवणेस परवानगी राहील.
6)  करमणूक / थीम पार्क 50% क्षमतेसह कार्यरत राहतील.
7) जलतरण तलाव, वॉटर पार्क 50% क्षमतेने खुले राहतील.
8)  भजने आणि इतर सर्व स्थानिक, सांस्कृतिक आणि लोक करमणुकीचे कार्यक्रम हॉल / ठिकाणाच्या 50% क्षमतेसह आयोजन करणेस परवानगी राहिल.
9)  विवाह सभारंभाच्या बाबतीत,  बंदिस्त व खुल्या जागेच्या ठिकाणी उपस्थितांची संख्या  200 किंवा जागेच्या क्षमतेच्या 25 %  पर्यंत यापैकी जे कमी असेल तेवढया लोकांना विवाह समारंभास उपस्थितीत राहणेस परवानगी असेल.
10) स्थानिक पर्यंटन स्थळे खुली करणेबाबत तेथील कोविड-19 परिस्थितीचा विचार करुन संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा INCIDENT COMMANDER  यांनी निर्णय घ्यावा.
11)  25 % पर्यंत प्रेक्षकांसह स्पर्धात्मक खेळ व त्याअनुषंगाने इतर क्रिडांना परवानगी असेल. उभ्याने पाहणा-या व फिरत्या लोकांची गर्दी सदर ठिकाणी असणार नाही.
12) कोविड-19 चे सर्व नियमांचे पालन करुन आठवडा बाजार चालू ठेवणेस परवानगी देणेत येत आहे.
13) व्यक्तींच्या हालचाली - रात्री 11.00 ते सकाळी 05.00 या कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई असेल.
14) रेस्टॉरंट्स, सिनेमागृहे,  नाटयगृहे 50 % क्षमतेने चालू ठेवणेस परवानगी राहील.  
या आदेशात नमुद असलेल्या निर्बंधाव्यतिरिक्त इतर सर्व निर्बंध इकडील आदेश क्र.डिसी/एमएजी/2/ एसआर/02/2022 दि.09/01/2022 व आदेश क्र.डिसी/एमएजी/2/एसआर/03/2022 दि.10/01/2022  नुसार लागू राहतील. तसेच या कार्यालयाकडून यापूर्वी निर्गमित केलेल्या व अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.    
CONTAINMENT ZONE बाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय दंडाधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढून CONTAINMENT ZONE जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश CONTAINMENT ZONE क्षेत्रास लागू राहतील.
सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपरिषद /नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.
सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी करावी.