maharashtra

जिल्ह्यात चौदा जुगार अड्डयांवर छापे


Raids on 14 gambling dens in the district
सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असणाऱ्या बारा जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १८ हजार ८०७ रुपये व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असणाऱ्या चौदा जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १८ हजार ८०७ रुपये व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील गुरुवार पेठ, तेली खड्डा येथे घराच्या आडोशाला उमेश उत्तम तपासे, रा. मल्हारपेठ, सातारा, यासीन शेख रा. गुरुवार पेठ, सातारा यांच्याकडून ७४० रुपये रोख रक्कम, कुडाळ, ता. जावली गावच्या हद्दीत मोरे कॉम्प्लेक्स पाठीमागे भिंतीच्या आडोशाला तेथीलच मनोज रमेश मेंगळे याच्याकडून १ हजार ५०० रुपये, लिंब, ता. सातारा गावच्या हद्दीत मानेवस्ती परिसरात पत्र्याच्या शेडच्या आडोशाला तेथीलच मोतीलाल काशिनाथ माने याच्याकडून ४३५ रुपये अंगापुर वंदन, ता. सातारा येथे गणेश हॉटेलच्या आडोशाला तेथीलच गौतम मोहन शिखरे याच्याकडून ९५५ रुपये, नागेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत कॅनॉलच्या कडेला पत्र्याच्या शेडच्या आडोशाला तेथीलच विनोद जगन्नाथ सावंत याच्याकडून ५४२ रुपये, सातारा येथील भूविकास बँक चौकामध्ये पान टपरीच्या आडोशाला जयसिंग हणमंत भोसले, रा. केसरकर पेठ, सातारा  व यासीन इक्बाल शेख, रा. शनिवार पेठ, सातारा याच्याकडून १ हजार १५, नागठाणे, ता. सातारा गावच्या हद्दीत पाण्याच्या टाकीजवळ तेथीलच धनाजी भगवान मोहिते याच्याकडून ८१५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
देगाव फाटा, ता. सातारा येथे पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला विजय हणमंत जाधव, रा. वर्ये, ता. सातारा आणि निलेश चोरगे रा. रविवार पेठ, सातारा यांच्याकडून १ हजार ६९० रुपये, धामणेर स्टेशन, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत तेथीलच नितीन किसन भोसले, दत्तात्रय सखाराम पवार, ताजुद्दीन कादरभाई मुलाणी, फारुख फकीर अहमद शेख, धनंजय कल्याणराव मगर, रा.धामणेर आणि संतोष गुलाब माने, रा. सासुर्वे यांच्याकडून २ हजार ९३० रुपये, संभाजीनगर ता. सातारा गावच्या हद्दीत शिवराज पेट्रोल पंपासमोर पत्र्याच्या टपरीच्या अडोषाला अतिश महेश कांबळे, रा. गुरुवार पेठ, सातारा यांच्याकडून ३८० रुपये, खोडद, ता. सातारा गावच्या हद्दीत उड्डाणपुलाच्या खाली अनिल पांडुरंग कट्टे रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण याच्याकडून सहाशे पन्नास रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
देशमुख नगर, ता. सातारा गावच्या हद्दीत पाण्याच्या टाकीजवळ तेथीलच विठ्ठल दिनकर शिंदे याच्याकडून १ हजार ४०० रुपये चिंचणी, ता. खटाव गावच्या हद्दीत तेथीलच अंकुश भगवान अहिवळे, मारुती दशरथ जाधव, नानासो युवराज जाधव, दौलत विठ्ठल गिरी,  प्रवीण हणमंत काळे, रा. काळेवाडी, ता. खटाव यांच्याकडून ५ हजार २०० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.