maharashtra

देगाव फाटा परिसरातून मोबाइलची चोरी


Mobile stolen from Degaon Fata area
देगाव फाटा, ता. सातारा परिसरातील एका चिकन सेंटरच्या समोरून एका महिलेचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाइल अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली.

सातारा : देगाव फाटा, ता. सातारा परिसरातील एका चिकन सेंटरच्या समोरून एका महिलेचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाइल अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २४ जानेवारी २०२२ रोजी पावणे एक वाजण्याच्या सुमारास देगाव फाटा येथील सातारा चिकन सेंटर  दुकानाच्या समोर पोर्णिमा अक्षय तुपे, रा. मोरे कॉलनी, रहिमतपूर रोड, एमआयडीसी, कोडोली, ता. सातारा ही महिला आली असता दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी तिच्या हातातील ८ हजार रुपये किमतीचा मोबाइल जबरदस्तीने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.