मधुमेहाच्या रुग्णांसाठी बडीशेप महत्वाची, याचा शरीराला काय फायदा आहे जाणून घ्या अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो.
युक्रेन - रशिया युद्धात गेल्या २० दिवसामध्ये युक्रेन मधील मोठमोठी शहरे उध्वस्त होऊन त्यांचे रूपांतर खंडरमध्ये झाले आहे. जेलस्की यांचे नाटो व युरोपिअन युनियन मध्ये युक्रेनचा समावेशाच्या स्वप्नामुळे संपूर्ण देश नष्ट होईला लागला आहे. युक्रेन चे राष्ट्राध्यक्ष जेलस्की याना या युद्धाचा अंत माहित असून युक्रेन यामध्ये हरणार आणि रशिया युक्रेन वर ताबा घेणार परंतु शरणागती पत्करून खुशीहाल देश रशियाचे ताब्यात देण्यापेक्षा संपूर्ण बेचिराग झालेला देश देऊन नवरा मेळा तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे असे वर्तवणूक करीत आहेत.
राममोहन खारकर हे साताऱ्यातील वकील आपल्या चारचाकी गाडीतून घरी जात असताना शाहूनगर परिसरात 5-6 इसमांनी रस्त्यात गाडी आडवी लावलेली असल्याने राममोहन ह्यांनी गाडी थांबवून त्या इसमांना मध्ये लावलेली गाडी रस्त्यावरून हटविण्याची विनंती केली. ह्यानंतर त्या इसमांपैकी एकाने लोखंडी गजाने वकीलांच्या गाडीची मागील काच फोडली. दरम्यान, गाडीच्या डाव्या बाजूच्या खिडकीतून ह्या इसमांपैकी एकजण पीडित वकीलांशी बोलत असताना उजव्या बाजूच्या खिडकीतून दुसऱ्या इसमाने लोखंडी गज वकीलांच्या डोळ्यावर मारला. हा मार इतका जबर होता की, काल पीडित वकीलाचा डोळा काढावा लागला.
कटगुण, ता. खटाव येथून चोरीस गेलेल्या 52 हजार किमतीच्या मोटारसायकलचा छडा लावून या घटनेतील संशयितास अटक करण्यात पुसेगाव पोलिसांना यश मिळाले आहे.
जुन्या केसच्या कारणावरून सातारा येथील एका महिलेला मारहाण झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीतून टाटा हत्ती वाहनातून अज्ञात चोरट्याने ३१ हजार रुपये किमतीच्या भांड्यांची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
चायनीजच्या उधारीचे पैसे मागितल्याने दोघांनी एकाच्या डोक्यात काचेची बाटली मारून त्याला धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
घारेवाडी, ता. कराड येथे साई पेट्रोल पंपाजवळ कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. कराड-ढेबेवाडी रस्त्यावर घारेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत साई पेट्रोल पंपाजवळ सोमवारी 14 रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पडळ, ता. खटाव येथील साखर कारखान्यावर ११ मार्च २०२१ रोजी झालेल्या मारहाणीत एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अखेर आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. त्यांनी न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातून सातारा जिल्हा बँकेची निवडणूक लढून ती जिंकली होती.
नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला सातारा येथे आज जोडे मारो आंदोलन करून दानवे यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा येत्या आठ दिवसांमध्ये रंधवे यांच्या जालना येथील निवासस्थानासमोर राज्यातील नाभिक समाजातील नागरिक मुंडन करून आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.