maharashtra

मोटारसायकल चोरी प्रकरणी एकास अटक


One arrested in motorcycle theft case
कटगुण, ता. खटाव येथून चोरीस गेलेल्या 52 हजार किमतीच्या मोटारसायकलचा छडा लावून या घटनेतील संशयितास अटक करण्यात पुसेगाव पोलिसांना यश मिळाले आहे.

पुसेगाव : कटगुण, ता. खटाव येथून चोरीस गेलेल्या 52 हजार किमतीच्या मोटारसायकलचा छडा लावून या घटनेतील संशयितास अटक करण्यात पुसेगाव पोलिसांना यश मिळाले आहे.
याबाबत पुसेगाव पोलिसांनी सांगितले, कटगुण ता. खटाव येथील विवेक प्रल्हाद गायकवाड यांनी आपल्या घरासमोर लावलेली त्यांची  मोटारसायकल (क्र. एम 11- बीटी.6845) 27 फेब्रुवारी रोजी चोरीस गेल्याची फिर्याद पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली होती. या घटनेची तातडीने दखल घेऊन सहायक पोलिस निरीक्षक संदिप शितोळे यांनी गोपनिय बातमिदारा मार्फत माहिती घेतली. त्यानुसार संशयित कुमार उर्फ गणेश नवनाथ पाटोळे राहणार कटगुण याने त्याच्या सोबतच्या दोन अल्पवयीन मुलांना घेऊन चोरलेल्या गाडीचे सर्व सुट्टे भाग कटगुण हद्दीतील विहीरीत व अन्यत्र ठेवले असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. या पथकाने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन 52 हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकलचे सर्व सुट्टे भाग जप्त केले व संशयीत कुमार उर्फ नवनाथ पाटोळे यास अटक केली. अधिक तपास सहायक फौजदार सुधीर येवले करत आहेत.