maharashtra

जुन्या केसच्या कारणावरून सातारा येथे महिलेला मारहाण


Woman beaten in Satara over old case
जुन्या केसच्या कारणावरून सातारा येथील एका महिलेला मारहाण झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : जुन्या केसच्या कारणावरून सातारा येथील एका महिलेला मारहाण झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ मार्च रोजी ११ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी टेकडी येथील आशा संतोष शिवपालक, प्रफुल्ल सुरेश घाडगे आणि अनिल बापू देवकुळे यांनी तेथीलच शबाना मेहबूब शेख यांना जुन्या केसच्या कारणावरून मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.