maharashtra

उधारीचे पैसे मागितल्याने एकाला मारहाण


One was beaten for asking for a loan
चायनीजच्या उधारीचे पैसे मागितल्याने दोघांनी एकाच्या डोक्यात काचेची बाटली मारून त्याला धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : चायनीजच्या उधारीचे पैसे मागितल्याने दोघांनी एकाच्या डोक्यात काचेची बाटली मारून त्याला धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ११ मार्च रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास आयटीआय कॉलेज भिंतीजवळ, मोळाचा ओढा, सातारा येथे शंकरराव रामूहरी नायक, रा. खंडोबाचामाळ, सातारा याने चायनीजचे उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून अजय (पुर्ण नाव माहीत नाही), ईश्वर बापू मोरे, रा. गेंडामाळ, सातारा या दोघांनी त्याच्या डोक्यात काचेची बाटली मारून तुझ्याकडे बघून घेतो, अशी धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.