नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला सातारा येथे आज जोडे मारो आंदोलन करून दानवे यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा येत्या आठ दिवसांमध्ये रंधवे यांच्या जालना येथील निवासस्थानासमोर राज्यातील नाभिक समाजातील नागरिक मुंडन करून आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
सातारा : नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला सातारा येथे आज जोडे मारो आंदोलन करून दानवे यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा येत्या आठ दिवसांमध्ये रंधवे यांच्या जालना येथील निवासस्थानासमोर राज्यातील नाभिक समाजातील नागरिक मुंडन करून आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, केंद्रीय मंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून नाभिक समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील नाभिक समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून रावसाहेब दानवे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा घ्यावा. रावसाहेब दानवे यांनी येत्या आठ दिवसाच्या आत नाभिक समाजाची माफी न मागितल्यास त्यांच्या जालना येथील निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी भाऊ दळवी, बापूराव काशीद, भरत लोकरे, सुरेश पवार, विजय सपकाळ, शंकरराव मर्दाने, संजय परदेशी, प्रमोद क्षीरसागर उपस्थित होते.


