Satara

esahas.com

इंधनबचत व पर्यावरण रक्षणासाठी सायकल हा उत्कृष्ट पर्याय : दिपक बेलवलकर

उत्तम आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी व इंधन बचतीसाठी सायकलच उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन दिपक बेलवलकर यांनी केले.

esahas.com

शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा करावा

शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करत असतो. तरीही त्याला पिकांना पाणी पाजण्यासाठी रात्री जायला सांगणे, हे  मानवी हक्काचे उल्लंघन आहे. रात्री अपरात्री जंगली श्वापदांच्या हल्ला होण्याची तसेच सर्पदंश होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकर्‍यांना शेती पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

esahas.com

1 वाघमारे, 5 पिणारे, 10 खाणारे आणि 0 वाचवणारे

स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा येथील रोहन बाळासाहेब वाघमारे (रा. आझादनगर, शाहूपुरी) या युवकावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. या तपासाकामी त्याला पोलिसांनी बोलविले असता प्रकरण अंगलट येतंय म्हणून त्याने त्या ठिकाणावरुन पोबारा केला. या सर्व भानगडीमध्ये त्याने पोलीस फौजदारालाच गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केला. एक भानगड जिरवण्यासाठी वाघमारेने दुसरी भानगड केली.

esahas.com

पेट्रोल पंपावर ATM Card ने पेमेंट करता? सावधान! अशी होतेय फसवणूक

ऑनलाइन ट्रान्झेक्शनमध्ये वाढ झाली असताना दुसरीकडे ऑनलाइन फ्रॉडच्या (Online Fraud) प्रकरणातही मोठी वाढ झाली आहे. जवळपास सर्वच ठिकाणी सायबर क्रिमिनल्स (Cyber Criminals) सक्रिय झाले आहेत. नुकतंच पोलिसांनी अशा सायबर क्रिमिनलला ताब्यात घेतलं आहे जे पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या खात्यातून पैसे चोरी करत होते. एटीएम कार्डद्वारे पेट्रोलचे पैसे भरणाऱ्या लोकांचं कार्ड क्लोन (ATM card) करुन त्यांच्या खात्यातून ऑनलाइन फ्रॉडद्वारे चोरी केली जात होती.

esahas.com

पायी चालणं आपण पूर्ण विसरलोय; भविष्यात वाईट घडण्यापूर्वी आजपासूनच या गोष्टींची काळजी घ्या

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बहुतेक लोकांना आरोग्यासाठी खूप काही करायला वेळ नसतो. म्हणून चालणं हा त्यांच्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. कारण यासाठी तुम्हाला तुमच्या रुटीनपेक्षा वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी वाहन वापरण्याऐवजी तुम्ही चालत जाऊन तुमच्या कॅलरीज बर्न करू शकता. चालणं हा तसा सर्वात सोपा आणि चांगला व्यायाम प्रकार आहे आणि त्याचे अनेक फायदे (Benefits of walking) देखील आहेत.

esahas.com

कधी काळी 35 रुपये कमवायचा, आज करोडोंत खेळतोय, वाचा Rohit Shetty ची इंटरेस्टिंग लाईफ स्टोरी

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीत अनेक दिग्गजांचा समावेश होतो. यामध्ये रोहित शेट्टी(Rohit Shetty ) हे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. त्याचे अॅक्शन आणि मसाला चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात. रोहित शेट्टी हा बॉलिवूड कलाकारांचा लाडका दिग्दर्शक आहे. यशाच्या शिखरावर असणारा रोहित कधी काळी 35 रुपये कमवायचा. मात्र, आज करोडोंत खेळतोय. रोहित शेट्टीचा जन्म 14 मार्च 1973 रोजी मुंबईत झाला. त्याच्या कुटुंबाचे कनेक्शन बॉलीवुडशी आहे. त्यांचे वडील एमबी शेट्टी हे चित्रपट उद्योगातील अॅक्शन कोरिओग्राफर, स्टंटमॅन आणि अभिनेते होते.

esahas.com

युटोपिया कंपनीतील तब्बल 13 कोटी 64 लाखांच्या चोरी, अपहार प्रकरणी आणखी दोघांना अटक

सातारा एमआयडीसीतील युटोपिया कंपनीतील 13 कोटी 64 लाख 71 हजार 876 रुपयांच्या चोरी, अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी दोघांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

esahas.com

शाहूनगर येथे न्यायाधिशाच्या भावावर प्राणघातक हल्ला

रस्त्यावरुन कारने जात असताना रस्त्यावरुन बाजूला व्हा, असे म्हटल्याच्या कारणातून चिडलेल्या युवकांच्या टोळक्याने शाहूनगर, सातारा येथे वकीलावर प्राणघातक हल्ला करुन त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली. जखमी वकीलांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, जखमी वकीलाचे बंधू न्यायाधिश असून त्यांच्या भावावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

esahas.com

सातारा भाजपा ने केला राज्य सरकारचा निषेध

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आकसाने, बेकायदा बजावलेल्या 160 च्या नोटिशीचा तीव्र निषेध करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आणि नोटीस जाळली.

esahas.com

यशवंतराव चव्हाण नितीमुल्ये जपणारे मानवतेचे मंदिर 

समाजाचे मन वाचण्याचे आणि समाज मन चेतवण्याचे शाब्दिक सामर्थ्य आणि वैचारिक ऐश्वर्य त्यांच्या ठायी होते. यशवंतराव हे नितीमुल्ये जपणारे मानवतेचे मंदिर असून नव्या पिढीने जाणतेपणाने त्यांच्या जीवनचरित्रातून सत्कर्माची प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डाँ. यशवंत पाटणे यांनी केले.