maharashtra

इंधनबचत व पर्यावरण रक्षणासाठी सायकल हा उत्कृष्ट पर्याय : दिपक बेलवलकर


Bicycle is the best option for fuel saving and environmental protection: Deepak Belwalkar
उत्तम आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी व इंधन बचतीसाठी सायकलच उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन दिपक बेलवलकर यांनी केले.

कराड : उत्तम आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी व इंधन बचतीसाठी सायकलच उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन दिपक बेलवलकर यांनी केले.
युवा पिढीमध्ये सायकलबाबत जनजागृती करण्यासाठी कराड ते वैष्णवीदेवी असा २ हजार ३७० किलोमीटरचा प्रवास कराड येथील 11 सायकल पट्टूंंनी नुकताच पुर्ण केला. याबद्दल कराड येथील सदाबहार ग्रुपच्या वतीने कुमार नलवडे, त्रिनेत्रनाथ जोशी, अनिल जाधव, नितीन कुलकर्णी, सचिन विभूते यांनी या सायकल स्वार दिपक वेलवलकर, महेश कुरकुटे, शिवाजी पाटील, वैभव गुरसाळे, रविराज पुजारी, विनोद पुजारी, विराज पुजारी, सचिन जगताप, संदीप चव्हाण, अनुज वेर्णेकर, सौसभ भस्मे, अक्षय कुंडले यांचा गौरव केला.
यावेळी अनेक सायकल चालविणाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यावरण रक्षणासाठी व इंधन बचतीबाबत यांनी कराड ते वैष्णवी देवी असा २ हजार ३७० किलोमीटरवरचा प्रवास चायकलीवरुन करुन जनजागृती केली आहे. दररोज हे १५० किलोमीटर प्रवास करीत होते.
यावेळी महेश कुरकुटे व शिवाजी पाटील यांनी अनेक प्रसंग कथन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदाबहार ग्रुपतर्फे कुमार नलवडे, त्रिनेत्रनाथ जोशी, अनिल जाधव, नितीन कुलकर्णी, सचिन विभूते व इतर सदस्यांनी सहकार्य केले.