maharashtra

वकीलावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वकीलांचे काम-बंद आंदोलन


Protests against lawyers' strike
राममोहन खारकर हे साताऱ्यातील वकील आपल्या चारचाकी गाडीतून घरी जात असताना शाहूनगर परिसरात 5-6 इसमांनी रस्त्यात गाडी आडवी लावलेली असल्याने राममोहन ह्यांनी गाडी थांबवून त्या इसमांना मध्ये लावलेली गाडी रस्त्यावरून हटविण्याची विनंती केली. ह्यानंतर त्या इसमांपैकी एकाने लोखंडी गजाने वकीलांच्या गाडीची मागील काच फोडली. दरम्यान, गाडीच्या डाव्या बाजूच्या खिडकीतून ह्या इसमांपैकी एकजण पीडित वकीलांशी बोलत असताना उजव्या बाजूच्या खिडकीतून दुसऱ्या इसमाने लोखंडी गज वकीलांच्या डोळ्यावर मारला. हा मार इतका जबर होता की, काल पीडित वकीलाचा डोळा काढावा लागला.

सातारा : राममोहन खारकर हे साताऱ्यातील वकील आपल्या चारचाकी गाडीतून घरी जात असताना शाहूनगर परिसरात 5-6 इसमांनी रस्त्यात गाडी आडवी लावलेली असल्याने राममोहन ह्यांनी गाडी थांबवून त्या इसमांना मध्ये लावलेली गाडी रस्त्यावरून हटविण्याची विनंती केली. ह्यानंतर त्या इसमांपैकी एकाने लोखंडी गजाने वकीलांच्या गाडीची मागील काच फोडली. दरम्यान, गाडीच्या डाव्या बाजूच्या खिडकीतून ह्या इसमांपैकी एकजण पीडित वकीलांशी बोलत असताना उजव्या बाजूच्या खिडकीतून दुसऱ्या इसमाने लोखंडी गज वकीलांच्या डोळ्यावर मारला. हा मार इतका जबर होता की, काल पीडित वकीलाचा डोळा काढावा लागला.
या हल्ल्यानंतर राममोहन यांचे सहकारी वकील मन्मथ आठले यांना राममोहन खारकर नंतर आता पुढील नंबर तुझा आहे, असं सांगणारा धमकीचा फोन आला होता. त्यामुळे, पुर्व-वैमनस्यातून संपुर्ण पूर्वतयारीनिशी हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या घटनेचा निषेध करण्याकरीता सातारा जिल्हा बार असोसिएशन कडून काम-बंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काल दिवसभरात सातारा जिल्ह्यात एकाही वकिलाने कोर्टात काम केले नाही. दरम्यान, सातारा जिल्हा बार असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यास कलम 353 च्या अंतर्गत विशेष अधिकारांखाली गून्हा नोंदविता येतो, तसाच कायदा डॉक्टरांच्या बाबतीतसुद्धा आहे. वकीलांच्या सुरक्षिततेसाठी असे काही प्रयोजन करावे, असे नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर सर्व आरोपी फरार असून संबंधित अज्ञात व्यक्तींविरोधात कलम 3०७ प्रमाणे (खूनाचा प्रयत्न) सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.