maharashtra

३१ हजार रुपयांच्या भांड्यांची चोरी


Theft of utensils worth Rs. 31,000
कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीतून टाटा हत्ती वाहनातून अज्ञात चोरट्याने ३१ हजार रुपये किमतीच्या भांड्यांची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीतून टाटा हत्ती वाहनातून अज्ञात चोरट्याने ३१ हजार रुपये किमतीच्या भांड्यांची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ ते १३ मार्च दरम्यान माने कॉलनी, देगाव रोड, कोडोली, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने टाटा हत्ती वाहन क्रमांक एम.एच ११ सीएच २९८१ मधुन ३१ हजार रुपये किमतीची तांबा, पितळ आणि स्टीलची भांडी चोरुन नेल्याची तक्रार सौ. सुरेखा संतोष शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.