घारेवाडी, ता. कराड येथे साई पेट्रोल पंपाजवळ कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. कराड-ढेबेवाडी रस्त्यावर घारेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत साई पेट्रोल पंपाजवळ सोमवारी 14 रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कराड : घारेवाडी, ता. कराड येथे साई पेट्रोल पंपाजवळ कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. कराड-ढेबेवाडी रस्त्यावर घारेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत साई पेट्रोल पंपाजवळ सोमवारी 14 रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विनोद निवृत्ती कांबळे रा. आणे ता.कराड असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर सौरभ सदाशिव कल्याणकर रा. कवठेमहांकाळ जि. सांगली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड-ढेबेवाडी रस्त्यावर साई पेट्रोल पंपाजवळ दुचाकीला ओव्हरटेक करताना कारने जोरदार
धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार विनोद कांबळे हा रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला राहुल देसाई, रविंद्र देसाई यांच्यासह नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. अपघाताची खबर राहुल देसाई यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी कार चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.