Satara

esahas.com

विक्रम पावसकर यांच्यावर कारवाई करा

चिथावणी खोर वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विक्रम विनायक पावसकर यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन इंडिया, शाखा महाराष्ट्र या संस्थेच्यावतीने पोलीस अधीक्षक अजय बंन्सल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

esahas.com

क्रेन इंडियातर्फे साताऱ्यातील वंचित मुलांच्या माहेर आश्रमच्या नवीन इमारतीचे उद्घाटन  

क्रेन इंडियाने भारतातील सातारा येथे त्यांच्या नवीन ११०००० चौरस फूट इंजिनीयर्ड चेक वॉल्व्हज कारखान्याचे उद्घाटन केल्याची घोषणा केली. तसेच त्याच दिवशी सकाळी त्यांनी वंचित मुलांसाठी स्थानिक क्रेन-अनुदानित माहेर होम कॉम्‍प्‍लेक्‍समध्‍ये दोन नवीन इमारतींचे अनावरण केले. जगभरातील क्रेनच्‍या इतर मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत क्रेन इंडियाचे अध्यक्ष हरी जिनागा यांच्या हस्‍ते या इमारतींचे उद्घाटन करण्‍यात आले.

esahas.com

सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित !

राजेंद्र राजपुरे यांनी महाबळेश्वर तालुक्यात बँकेच्या माध्यमातून समाजकारणात व राजकारणात झोकून देऊन काम केले आहे. डोंगराळ व दुर्गम महाबळेश्वर तालुक्याचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. महाबळेश्वरला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या.

esahas.com

धनगर समाजातील मुलांसाठी तालुकास्तरीय कार्यशाळेसाठी प्रयत्नशील : संजय शेडगे

धनगर समाज शेतीपूरक व्यवसायाकडे वळत असून अशा मुलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि बँकांची कर्जे कशी मिळतील यासाठी सातारा तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती राजमाता अहिल्यादेवी होळकर महोत्सव पठार सातारचे प्रमुख संजय शेडगे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली.

esahas.com

हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून नऊ जण बेपत्ता

जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून नऊ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.

esahas.com

मंगळवार पेठेतून दुचाकीची चोरी

मंगळवार पेठ, सातारा येथून दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

युवकाचे अपहरण करुन गंभीर मारहाण करणाऱ्या साताऱ्यातील आठजणांना अटक

साताऱ्यातील एका युवकाचे आनेवाडी टोलनाक्यावरुन अपहरण करुन त्याला गंभीर मारहाण केल्याप्रकरणी भुर्इंज पोलिसांनी सैदापूर, शाहूपुरी परिसरातील आठजणांना अटक केली आहे.

esahas.com

सेवा पंधरवड्यामध्ये तब्बल 55 हजार प्रकरणांचा निपटारा

राज्य शासनाच्या आदेशाने सातारा जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान राबवण्यात आलेल्या सेवा पंधरवड्यामध्ये महसूल विभागाच्या प्रलंबित 55 हजार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.

esahas.com

झेडपी च्या सीईओपदी ज्ञानेश्वर खिलारी; चंद्रपुर जिल्हाधिकारीपदी विनय गौडा

सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची पदोन्नतीने चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर ज्ञानेश्वर खिलारी हे सातारा जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.