maharashtra

जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून नऊ जण बेपत्ता


जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून नऊ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.

सातारा : जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून नऊ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कार्वॆ तालुका कराड येथील राहत्या घरातून श्रेया अंकुश गाडवे वय 22 ही युवती कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत सौ. कोमल सोमनाथ मंडले राहणार कार्वॆ, तालुका कराड ही विवाहिता आपल्या दोन्ही मुलांसह राहत्या घरातून कुठेतरी निघून गेली आहे.
तिसऱ्या घटनेत सौ. कोमल सागर जाधव रा. बोडके ता. माण ही महिला आपल्या मुलीसह दवाखान्यात जाते असे सांगून घरातून निघून गेली आहे.
चौथ्या घटनेत अमोल जालिंदर खरात वय 36, रा. गुणवरे तालुका फलटण हे राहत्या घरातून बँकेमध्ये खाते खोलायचे आहे, असे सांगून दि. 11 ऑक्टोबर रोजी निघून गेले आहेत.
पाचव्या घटनेत गणेश शिवाजी फरांदे वय 29 रा. फुलेनगर, भुईंज ता. वाई हे राहत्या घरातून भुईंज येथे घरी जाऊन येतो असे सांगून कुठेतरी निघून गेले आहेत.
सहाव्या घटनेत रोहिणी नवनाथ ताकपिरे रा. प्रतापसिंहनगर ही युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेली आहे. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.