maharashtra

मंगळवार पेठेतून दुचाकीची चोरी


मंगळवार पेठ, सातारा येथून दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : मंगळवार पेठ, सातारा येथून दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली विक्रम आनंद माने वय 39, रा. मोरेश्वर अपार्टमेंट मंगळवार पेठ सातारा यांची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एमएच 11 बीसी 7784 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून म. पो. हवा. जाधव अधिक तपास करीत आहेत.