maharashtra

विक्रम पावसकर यांच्यावर कारवाई करा


चिथावणी खोर वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विक्रम विनायक पावसकर यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन इंडिया, शाखा महाराष्ट्र या संस्थेच्यावतीने पोलीस अधीक्षक अजय बंन्सल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

सातारा : चिथावणी खोर वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विक्रम विनायक पावसकर यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन इंडिया, शाखा महाराष्ट्र या संस्थेच्यावतीने पोलीस अधीक्षक अजय बंन्सल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे, वाठार स्टेशन येथे दुर्गामाता दौडच्या कार्यक्रमा निमित्ताने भाषण करताना विक्रम विनायक पावसकर यांनी सामाजिक भान विसरून दोन समाजात जातीय निर्माण करणारे, धार्मिक सलोखा बिघडणारे, अल्पसंख्यांक समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे. वास्तविक प्रेम व विवाह या प्रत्येकाच्या वैयक्तिक बाबी आहेत. कोणी कोणाशी विवाह करावा हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. असे असताना त्याला धर्माशी जोडून अल्पसंख्याकांविषयी एकेरी टीकाटिपणी करून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तरी निर्माण होईल असे आक्षेपार्ह विधान केल्याचे सोशल मीडियावर दिसून येते. अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या विक्रम पावसकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अब्दुलभाई सुतार, सल्लागार एडवोकेट रफिक शेख, सातारा जिल्हाध्यक्ष रशीद भाई बागवान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.