हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गबऱ्या उर्फ अक्षय रंगनाथ लोखंडे वय 22, रा. सैदापूर, ता. सातारा याला पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी हद्दपार केले होते. मात्र लोखंडे हा दिनांक 11 ऑक्टोबर रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील राधिका चौक ते कोटेश्वर मंदिर जाणाऱ्या रस्त्यावरील कॉलेजच्या समोर असणाऱ्या फुटपाथवर सापडला आहे. या विरोधात सचिन महादेव पवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पो. हवा. ढमाळ अधिक तपास करीत आहेत.