विक्रम पावसकर यांनी कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे दुर्गा माता दौड दरम्यान मुस्लिम बांधवांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषण करून हिंदू-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू दिसून येत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजीक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रूपयांच्या बदल्यात २० कोटींची मागणी करून व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यासह १४ जणांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पोवईनाका परिसरातील एका लॅब समोरून कॉलेज वरून घरी निघालेल्या युवतीचे काही बुरखाधारी व्यक्तींकडून अपहरणाचा प्रयत्न अश्या आशयाच्या ब्रेकिंग न्यूज समाज माध्यमांवर धडकल्या.
पिस्तुलाचा धाक दाखवून येथील रामाचा गोट येथे वास्तव्य करणाऱ्या एका बहीण, भावाला धमकी दिल्याप्रकरणी ९ जणांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हॉटेल मालकास मारहाण करून खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बोलेरो जीपने पाठीमागून दुचाकीला धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोलोरो जीपवरील अज्ञात चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सळई चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील केसरकर पेठेत वास्तव्य करणाऱ्या एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या एका कॉलनीतील बंगल्यातून १ लाख रुपयांसह सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.