बोलेरो जीपने पाठीमागून दुचाकीला धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोलोरो जीपवरील अज्ञात चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : बोलेरो जीपने पाठीमागून दुचाकीला धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोलोरो जीपवरील अज्ञात चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ९ रोजी १०.१५ वाजण्याच्या सुमारास बोलेरो जीप क्रमांक एम. एच. ११ बीव्ही १९४९ वरील अज्ञात चालकाने जीप भरधाव वेगाने चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुरज लक्ष्मण साबळे वय ३०, रा. वडुथ, ता. सातारा याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार तुषार शिवाजी साबळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञात बोलेरो जीप चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.


