maharashtra

मोबाईलची चोरी


मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोरेगाव ता. कोरेगाव गावच्या हद्दीत तहसील कार्यालय आवारातील तलाठी हॉल येथे नायब तहसीलदार सुयोग यशवंत बेंद्रे वय 33, रा. कोरेगाव ता. कोरेगाव यांचा सॅमसंग कंपनीचा वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. या घटनेची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाले असून पो. ना. पवार अधिक तपास करीत आहेत.