maharashtra

चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा येथील एकावर गुन्हा


सळई चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील केसरकर पेठेत वास्तव्य करणाऱ्या एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सळई चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील केसरकर पेठेत वास्तव्य करणाऱ्या एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १० ऑक्टोंबर रोजी ५ वाजण्याच्या सुमारास अहमद हैदर अली कागदी, रा. गुरुवार पेठ, सातारा यांच्या राहत्या घराजवळून १ हजार २०० रुपये किंमतीच्या सळईचा गठ्ठा चोरून घेत असताना विष्णू मोतीराम बनपट्टे वय २४, रा. केसरकर पेठ, सातारा हा आढळून आल्याची तक्रार अहमद हैदर अली कागदी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर बनपट्टे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.