पोवईनाका परिसरातील एका लॅब समोरून कॉलेज वरून घरी निघालेल्या युवतीचे काही बुरखाधारी व्यक्तींकडून अपहरणाचा प्रयत्न अश्या आशयाच्या ब्रेकिंग न्यूज समाज माध्यमांवर धडकल्या.
सातारा : पोवईनाका परिसरातील एका लॅब समोरून कॉलेज वरून घरी निघालेल्या युवतीचे काही बुरखाधारी व्यक्तींकडून अपहरणाचा प्रयत्न अश्या आशयाच्या ब्रेकिंग न्यूज समाज माध्यमांवर धडकल्या.
या बाबत सातारा पोलिसांनी खुलासा जाहीर करत असे म्हंटले आहे कि, अश्या प्रकारची कोणतीच घटना या परिसरात कोठेही घडली नाही. या प्रकरणात पोलिसांकडे कोणतीही तक्रार नसतानाही पोलीस दलाने या बाबत मीडियामध्ये प्रसारित झालेल्या काही बातम्यांची दखल घेत चौकशी सुरू केली. त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांकडे चौकशी करण्यात आली. मात्र अशी कोणतीच घटना घडताना होताना कोणीच पाहिले नसल्याचे समोर आले.
समाजमाध्यमांवर आलेल्या बातम्या आणि त्यानंतर पालकांमध्ये निर्माण झालेले घबराटीचे वातावरण लक्षात घेऊन शहर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. शहर पोलिसांकडून या घटनेची बारकाईने चौकशी दरम्यान धक्कादायक सत्य समोर आले.
संबंधित युवती हि तिचे कॉलेज सुटल्यावर यवतेश्वर या ठिकाणी फिरायला गेली होती. तिला परत येण्यास खूपच उशीर झाल्याने घरचे लोक ओरडतील, या भीतीने तिने काही बुरखाधारी लोकांनी तिचे अपहरण केल्याचा बनाव केला आणि आपला मान सोडवली.
या बाबत तपास करणाऱ्या पोलिसांनाही तिने हेच सांगितले. ती सपशेल खोट बोलत आहे, हे पोलिसांच्या सराईत नजरेने लगेच हेरले आणि थोडी जास्त चौकशी केली असता तिने हा सगळा बनाव असल्याचे मान्य केले.
पोवाईनाका परिसरात अशी कोणतीच घटना घडली नाही. कोणतेच बुरखाधारी लोक मुलींना पळवत नाही, की शहरात कोठेच लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय नाही. नागरिकांनी अश्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि समाज माध्यमांवर अशी बातमी ब्रेक करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासून पहावी, घटनेची माहिती घ्यावी. अतिउत्साहात चुकीच्या गोष्टी समाज माध्यमांवर टाकू नयेत, असे आवाहन सातारा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.


