maharashtra

सातारा येथून एक लाख रुपयांसह दागिने चोरीस; चोरट्यावर गुन्हा


येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या एका कॉलनीतील बंगल्यातून १ लाख रुपयांसह सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या एका कॉलनीतील बंगल्यातून १ लाख रुपयांसह सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ९ रोजी सकाळी ७ ते दि. १० रोजी ६ वाजण्याच्या सुमारास सदरबझार परिसरात असणाऱ्या कुपर कॉलनीत वास्तव्य करणाऱ्या सौ. सावित्री हणमंत जगदाळे यांच्या बंगल्याची खिडकी उचकटून, दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. बंगल्यातील १ लाख ८ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.