Satara

esahas.com

जलजीवन योजनेसाठी विरोधकांनी काय परिश्रम घेतले ते स्पष्ट करावे : बाळासाहेब जाधव

विरोधक या योजनेचे श्रेय घेण्यासाठी लोकांची दिशाभूल करत असून योजनेसाठी त्यांनी काय परिश्रम घेतले ते स्पष्ट करावे, असे आवाहन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले.

esahas.com

गणेश अहिवळे यांची साताऱ्यात मशाल फेरी

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी पक्षाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर सोमवारी रात्री 11 वाजता साताऱ्यातून धावत मशाल फेरी काढली. ही मशाल अंधेरीची पोट निवडणूक होईपर्यंत विझून देणार नाही असा निर्धार करत अहिवळे यांनी काढलेली मशाल फेरी चर्चेचा विषय ठरली.

esahas.com

वय कमी करुन सैन्यात भरती करतो म्हणून 3 लाखांची फसवणूक

आर्मीमध्ये नोकरीला लावतो म्हणून कोरेगाव तालुक्यातील एकाला फलटण तालुक्यामधील एकाने व माण तालुक्यातील एकाने फसवले असल्याबाबत तक्रार दाखल झाल्यावर दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रविंद्र नामदेव कोडवलकर व अवचित दादासो ताटे अशी फसवणूक करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत.

esahas.com

कर्दे समुद्रात बुडालेल्या पाचगणीतील युवकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कर्दे समुद्रात बुडालेल्या युवकाचा मृतदेह तब्बल 16 तासानंतर शोध मोहिमेत सापडला आहे. स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी रविवारी सायंकाळपासून ही शोध मोहीम सुरू केली होती. अखेर सौरभ प्रकाश घावरे राहणार पाचगणी तालुका महाबळेश्वर याचा मृतदेह हाती लागला आहे.

esahas.com

जालना येथील वकिलाच्या खून प्रकरणातील विकास मस्के याला सातारा येथे अटक

जालना येथील वकील किरण लोखंडे यांच्या खून प्रकरणातील विकास गणेश मस्के याला सातारा येथे अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

esahas.com

जात हरवली आहे; सी.बी.आय तपास करावा

जात हरवली आहे. याबाबत सी.बी.आय तपास करावा, या मागणीसाठी भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब क्षीरसागर यांनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर आजपासून उपोषणास प्रारंभ केला.

esahas.com

जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे आंदोलन

जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेने (सिटू) आज विविध मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर आंदोलन करून निवेदन दिले.

esahas.com

लंम्पी रोगाने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना मिळणार सरसकट मदत

जो शेतकरी पशुपालक आहे, ज्यांच्या जनावरांचा लंम्पी रोगाने मृत्यू झाल्याची झाला आहे. अशा जनावरांच्या मालकांना सरसकट मदत देण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मान्य झाली आहे, अशी माहिती आ. शशिकांत शिंदे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

चाहूर- खेड येथे रक्तदान शिबीर संपन्न

चाहूर - खेड येथील शिवतेज मंडळाच्या वतीने रक्तदान व रक्ततपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ४० लोकांनी रक्तदान केले. तसेच सुमारे ६० लोकांची रक्ततपासणी करून हिमोग्लोबीन, शुगर, रक्तातील पेशींचे प्रमाण या सह अन्य विकारांवर मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

esahas.com

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठेकेदाराची केंद्रीय अधिकाऱ्यालाच दमबाजी

एका अन्न पुरवठा ठेकेदाराने थेट केंद्रीय अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांसमक्ष दमबाजी करण्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद नव्हती. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी बैठक तर शांततेत झाल्याचे सांगत कानावर हात ठेवले.