maharashtra

जात हरवली आहे; सी.बी.आय तपास करावा

भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब क्षीरसागर यांची मागणी

जात हरवली आहे. याबाबत सी.बी.आय तपास करावा, या मागणीसाठी भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब क्षीरसागर यांनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर आजपासून उपोषणास प्रारंभ केला.

सातारा : जात हरवली आहे. याबाबत सी.बी.आय तपास करावा, या मागणीसाठी भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब क्षीरसागर यांनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर आजपासून उपोषणास प्रारंभ केला.
याबाबत प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गतवर्षी मी रावसाहेब कोंडीबा क्षीरसागर रा. चोपदारवाडी, ता. पाटण माझे जात पडताळणीचे प्रकरण सातारा येथील जिल्हा जात पडताळणी समितीकडे दाखल केले होते. मी हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या गॅस वाहतुकीचे टेंडर भरले होते. त्यामध्ये मला एक टँकर मंजूर झाला होता. स्टॅन्डअप इंडिया या योजनेच्या माध्यमातून ४३ लाख रुपयांचा एक टँकर खरेदी केला आणि तो कंपनीकडे लावला. सातारा जिल्ह्यात माझ्यासह असे नऊ लाभार्थी होते. आम्हाला बँक ऑफ बडोदा या बँकेने कर्ज पुरवठा केला. यामध्ये ए.सी. प्रवर्गासाठी राज्याची १५ टक्के तर केंद्राची २५ टक्के सबसिडी होती. राज्याची ६ लाख रुपयांची सबसिडी मंजूर झाली. मी सोडून बाकी इतर माझ्या सहकाऱ्यांच्या बँक खात्यात या सबसिडीची रक्कम जमा झाली. मात्र माझा जात पडताळणी दाखला न मिळाल्याने तो लाभ मला मिळाला नाही. गेल्या तीन पिढ्या माझ्या कुटुंबातील सदस्यांना मागासवर्गीय सवलतींचा कोणताही लाभ झाला नाही. तो मिळवण्यासाठी जात पडताळणीची मागणी केली जात आहे. त्यामुळे जात हरवली आहे, याचा सी.बी.आय तपास व्हावा या मागणीसाठी मी आमरण उपोषण करत असून मागास व इतर घटकांना ज्या सवलती, अधिकार मिळाले ते आम्हालाही मिळावेत. न मिळाल्यास गनिमी काव्याने आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.