जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेने (सिटू) आज विविध मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर आंदोलन करून निवेदन दिले.
सातारा : जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेने (सिटू) आज विविध मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर आंदोलन करून निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, बांधकाम कामगारांना दिवाळीचा २ हजार रुपये बोनस मिळावा यासह आज राज्यभर संघटनेच्यावतीने आंदोलन सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करीत आहोत. मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना मासिक २ हजार रुपये पेन्शन मिळावी. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे थकीत प्रकरण त्वरित मंजूर करावे. नवीन प्रकरणे त्वरित हाती घेण्यात घ्यावे. कामगारांची घरकुल प्रकरणे मंजूर करण्यात यावी. कामगारांच्या मुलीच्या लग्नास ५१ हजार रुपये अनुदान देण्यास सुरुवात करावी. निवृत्तीनंतर कामगारांना ५ हजार रुपये पेन्शन द्यावी. आरोग्याची मेडिकल योजना सुरू करण्यात यावी. कामगारांची नवीन नोंदणी व नोंदणीकरण प्रक्रिया सुलभ करावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात कॉ. माणिक अवघडे, मनोज चाकणकर, संतोष पैठणकर, संतोष घागरे, अमरराजे दीपक पाटोळे, सचिन शेळके, प्रकाश नलावडे, दत्ता राऊत सहभागी झाले होते.


