maharashtra

चाहूर- खेड येथे रक्तदान शिबीर संपन्न


चाहूर - खेड येथील शिवतेज मंडळाच्या वतीने रक्तदान व रक्ततपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ४० लोकांनी रक्तदान केले. तसेच सुमारे ६० लोकांची रक्ततपासणी करून हिमोग्लोबीन, शुगर, रक्तातील पेशींचे प्रमाण या सह अन्य विकारांवर मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

सातारा : चाहूर - खेड येथील शिवतेज मंडळाच्या वतीने रक्तदान व रक्ततपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ४० लोकांनी रक्तदान केले. तसेच सुमारे ६० लोकांची रक्ततपासणी करून हिमोग्लोबीन, शुगर, रक्तातील पेशींचे प्रमाण या सह अन्य विकारांवर मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
मंडळाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असून यंदाचे दहावे वर्ष आहे. साताऱ्यात रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळाने आयोजित केलेला रक्तदान शिबीराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ. छाया कदम यांनी केले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी राहुल कदम, रजत कदम, शुभम कदम, संकेत कदम, वैभव अभंग, चंदन कदम, वैभव कदम, प्रतिभा कदम, वैष्णवी कदम व मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कदम, सौ. वसुंधरा कदम, सौ. कविता मोरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.