पिस्तुलाचा धाक दाखवून येथील रामाचा गोट येथे वास्तव्य करणाऱ्या एका बहीण, भावाला धमकी दिल्याप्रकरणी ९ जणांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : पिस्तुलाचा धाक दाखवून येथील रामाचा गोट येथे वास्तव्य करणाऱ्या एका बहीण, भावाला धमकी दिल्याप्रकरणी ९ जणांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सौ. माधवी प्रशांत कदम वय ४५, रा. दत्त अपार्टमेंट, फ्लॅट नंबर १३, रामाचा गोट, सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. ७ ऑक्टोंबर रोजी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी अपूर्वा हिने इंस्टाग्रामवर एकाबरोबर काढलेला फोटो पोस्ट केला. त्याखाली मिस यु भैय्या असे लिहिले होते. मात्र गैरसमजातून पराग निवळे रा. मनामती चौक, सातारा., प्रसन्न दीक्षित, दाद्या खरात दोघेही रा. रामाचा गोट व इतर सहा अनोळखी इसम घरी आले. त्यापैकी पराग निवळे यांनी अपूर्वाच्या डोक्याला पिस्तुल लावून तुझा इंस्टाग्राम व त्याचा पासवर्ड नंबर मला दे, असे सुनावले. यावेळी अपूर्वा चा भाऊ प्रणव मध्ये पडल्याने त्याच्याही डोक्यास पिस्तुल लावून धमकी दिल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


