सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित !
राजेंद्र राजपुरे यांनी महाबळेश्वर तालुक्यात बँकेच्या माध्यमातून समाजकारणात व राजकारणात झोकून देऊन काम केले आहे. डोंगराळ व दुर्गम महाबळेश्वर तालुक्याचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. महाबळेश्वरला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या.
सातारा : राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान कर्नाटक यांचेमार्फत राज्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तिांना पुरस्कार जाहिर केला जातो. या वर्षी सदर पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 08 ऑक्टोबर 2022 रोजी बेळगाव येथे मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना आंतरराज्य सहकार रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करणेत आले. बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील यांचे हस्ते व उपाध्यक्ष अनिल देसाई, दत्तानाना ढमाळ, रामराव लेंभे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, संचालिका सौ. कांचन साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील यांचे उपस्थितीत राजेंद्र राजपुरे आणि डॉ. राजेंद्र सरकाळे यांचा यथोचित सत्कार करणेत आला.
राजेंद्र राजपुरे यांनी महाबळेश्वर तालुक्यात बँकेच्या माध्यमातून समाजकारणात व राजकारणात झोकून देऊन काम केले आहे. डोंगराळ व दुर्गम महाबळेश्वर तालुक्याचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. महाबळेश्वरला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी पतपुरवठा वाढवून शेतकर्यांना दिलासा दिला तसेच विकास सेवा संस्थांचे बळकटीकरणासाठी प्रयत्न करून सोसायटी सभासदांचे आर्थिक जीवन उंचावणेचा प्रयत्न केला. सन 2007 साली बँकेचे संचालक, सन 2009 मध्ये उपाध्यक्ष तसेच महाबळेश्वर तालुक्यातील पतसंस्थांचे मार्गदर्शक म्हणून यशस्वी कामकाज केले असून महाबळेश्वर तालुक्यामध्ये स्ट्रॉबेरी, फळे व फुले संबंधित संस्था व फार्मर्स प्रोडुसर कंपनीची निर्मिती केली आहे. नुकतेच सकाळ उद्योग समूहातर्फे राजेंद्र राजपुरे यांना जनरेशन नेक्स्ट पुरस्काने सन्मानित केले आहे. या त्यांच्या सर्वंकष कार्याची दाखल घेऊनच त्यांना आंतरराज्य सहकार रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.
डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सामाजिक, कृषी व बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज केलेले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सामाजिक, कृषी व सहकार क्षेत्रातील विविध सामाजिक, कृषी व सहकार क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. कृषी विकासासाठी डॉ. सरकाळे यांनी बँकेच्या माध्यमातून कार्यान्वित केलेल्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करून सर्वसामान्य शेतकर्याना केंद्रस्थानी ठेऊन त्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणे व कृषीच्या माध्यमातून ग्रामीण जनजीवनात अमुलाग्र बदल घडवून कृषी क्रांती केलेली आहे.
तीस देशांचा शेतीविषयक अभ्यास दौरा केला असून शेतीविषयक पाच पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. कृषी व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामकाजाबद्दल विविध नामवंत संस्थांनी त्यांना वीस पेक्षाही जास्त पुरस्काराने सन्मानित केले आहे. बँकिंग फ्रंटायर्स मुंबई, कर्नाडस् बँकिंग रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, कोल्हापूर तसेच राज्य बँक असोसिएशन मुंबई यांच्यावतीने डॉ. राजेंद्र सरकाळे यांना उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी’म्हणून त्यांच्या सर्वंकष बाबींची नोंद घेवून विविध संस्थांनी जवळपास 21 राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे.


