क्रेन इंडियाने भारतातील सातारा येथे त्यांच्या नवीन ११०००० चौरस फूट इंजिनीयर्ड चेक वॉल्व्हज कारखान्याचे उद्घाटन केल्याची घोषणा केली. तसेच त्याच दिवशी सकाळी त्यांनी वंचित मुलांसाठी स्थानिक क्रेन-अनुदानित माहेर होम कॉम्प्लेक्समध्ये दोन नवीन इमारतींचे अनावरण केले. जगभरातील क्रेनच्या इतर मान्यवरांच्या उपस्थितीत क्रेन इंडियाचे अध्यक्ष हरी जिनागा यांच्या हस्ते या इमारतींचे उद्घाटन करण्यात आले.
सातारा : गेल्या महिन्यात क्रेन इंडियाने भारतातील सातारा येथे त्यांच्या नवीन ११०००० चौरस फूट इंजिनीयर्ड चेक वॉल्व्हज कारखान्याचे उद्घाटन केल्याची घोषणा केली. तसेच त्याच दिवशी सकाळी त्यांनी वंचित मुलांसाठी स्थानिक क्रेन-अनुदानित माहेर होम कॉम्प्लेक्समध्ये दोन नवीन इमारतींचे अनावरण केले. जगभरातील क्रेनच्या इतर मान्यवरांच्या उपस्थितीत क्रेन इंडियाचे अध्यक्ष हरी जिनागा यांच्या हस्ते या इमारतींचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनाप्रसंगी क्रेन बिल्डिंग सर्विसेसचे अध्यक्ष रिचर्ड टक, क्रेन सीपीईचे अध्यक्ष गुस्तावो क्रूझ, क्रेन मिडल इस्ट अॅण्ड आफ्रिकाचे अध्यक्ष मार्क युसेफ, ग्लोबल सेल्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष जुर्गेन सॉन्डरचेफर, माहेरच्या सीनियर लुसी कुरियन आणि इतर स्थानिक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
सध्या माहेर कॅम्पसमध्ये क्रेन फंड्सद्वारे दान केलेल्या निधीतून बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचा समावेश आहे आणि या इमारतींमध्ये जवळपास १०० मुले व मुली सामावतील. ज्यामुळे या वंचित निवासींना सुरक्षित आश्रयस्थान मिळेल. मागील दशकापासून माहेरला स्वतंत्र सेवाभावी उपक्रमांसाठी क्रेनचा अविरत पाठिंबा मिळाला आहे. हे स्वतंत्र सेवाभावी उपक्रम क्रेन सहयोगी व त्यांच्या कुटुंबांना, स्थानिक समुदायांना, शैक्षणिक संस्थांना आणि जगभरातील मदतकार्यांना साह्य करतात.
क्रेन इंडियाचे अध्यक्ष हरी जिनागा म्हणाले, गेल्या ३० वर्षांत स्थानिक समुदायांमध्ये आमच्या योगदानामुळे आणि गुंतवणवूकीद्वारे क्रेन इंडिया ही देशातील एक प्रभावशाली कंपनी बनली आहे. नवीन इंजिनीयर्ड चेक व्हॉल्व्ह कारखान्याच्या उद्घाटनासोबतच आज आम्ही सातारा येथील वंचित मुलांसाठी क्रेन-अनुदानित माहेर होम कॉम्प्लेक्समध्ये आणखी एका इमारतीचे उद्घाटन करत स्थानिक स्वयंसेवी संस्था माहेरसोबतच्या आमच्या भागीदारीची पुष्टी केली आहे.
माहेर आश्रमच्या सिस्टर लुसी कुरियन म्हणाल्या, आशा, आपलेपणा आणि समजूतदारपणाचे आश्रयस्थान. लिंग, जात, पंथ किंवा धर्म यांचा विचार न करता संपूर्ण भारतातील निराधार महिला, मुले आणि पुरुषांना त्यांच्या उच्च दर्जाच्या जीवनाचा अधिकार वापरण्यास मदत करण्याचा आमचा मनसुबा आहे. माहेर औदार्य आणि परोपकाराच्या या दयाळू कृतीसाठी, तसेच माहेरवर विश्वास व आत्मविश्वास दाखवण्यासाठी क्रेन व त्यांच्या स्थानिक प्रमुखांचे आभार मानते.


