Satara

esahas.com

एसटी प्रवासात वृद्धेचे सुमारे दोन लाखाचे दागिने चोरीस

पुणे ते सातारा व तेथून खातगुण या प्रवासादरम्यान रेवलकरवाडी तालुका खटाव येथील 68 वर्षीय वृध्देचे दागिने प्रवासात चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे.

esahas.com

कस्तुरबा रुग्णालयाच्या पडक्या इमारतीत आढळला बेवारस मृतदेह

भवानी पेठेतील कस्तुरबा रुग्णालय परिसरातील एका पडक्या इमारतीत 30 ते 35 वयोगटातील पुरुष जातीचा बेवारस मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाच्या अंगात पोपटी रंगाचे जर्किन व काळा शर्ट आहे. त्याचे तोंड व पाय पूर्णपणे सडलेल्या अवस्थेमध्ये होते.

esahas.com

मेडिकल कॉलेजच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी

सिव्हिल हॉस्पिटल परिसरात भरणार्‍या मेडिकल कॉलेजच्या पार्किंग मधून 20 हजार रुपये किमतीची सुझुकी एक्सेस मोटार सायकल अज्ञाताने चोरून नेली. हा प्रकार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या दरम्यान घडला आहे.

esahas.com

बांधकाम साहित्याची चोरी करणार्‍या विरोधात गुन्हा

विकसकाच्या बांधकाम साइटवरून सेंट्रिंग चे 30 हजार रुपये किमतीचे साहित्य रिक्षातून जबरदस्तीने घेऊन जाणार्‍या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या दोघांविरोधात गुन्हा

जातीवाचक शिवीगाळ करून एकाला दमदाटी करणार्‍या दोघांविरोधात वाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल प्रकाश मोरे वय 25, राहणार बलकवडी, तालुका वाई यांनी फिर्याद दिली आहे.

esahas.com

आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

तडीपारीचा आदेश बजावलेला सराईत गुन्हेगार लक्ष्मी टेकडी येथे स्वतःचे अस्तित्व लपवून राहत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुधीर तानाजी सावंत वय 19, रा. जय जवान सोसायटी, सदर बाजार सातारा असे त्याचे नाव आहे. सातारा शहर पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे.

esahas.com

मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास 10 वर्षे कारावास आणि 5 हजार रुपये दंड

मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने 10 वर्षे कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

esahas.com

म्हसवड बाजार समितीचा सचिव लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

दहिवडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अंतर्गत येणाऱ्या म्हसवड येथील बाजार समितीतर्फे बांधण्यात येणाऱ्या गाळा भाड्याने देण्याच्या प्रक्रिया संदर्भात पन्नास हजाराची लाच घेताना म्हसवड बाजार समितीचा सचिव रमेश रामभाऊ जगदाळे वय 56 राहणार राणंद, तालुका माण याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

esahas.com

महामार्गावर दुचाकीवर स्टंटबाजी करणाऱ्या दोघांवर कारवाई

पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वर उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्या दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली.

esahas.com

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकास सहा महिने शिक्षा

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी न्यायालयाने दीपक बाजीराव पिसाळ, वय ४४, रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव याला सहा महिन्याची शिक्षा ठोठावली.