सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी न्यायालयाने दीपक बाजीराव पिसाळ, वय ४४, रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव याला सहा महिन्याची शिक्षा ठोठावली.
सातारा : सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी न्यायालयाने दीपक बाजीराव पिसाळ, वय ४४, रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव याला सहा महिन्याची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. २४ सप्टेंबर रोजी २०१४ रोजी बारा वाजण्याच्या सुमारास पिंपोडे बुद्रुक येथील श्रीराम किराणा स्टोअर्स दुकानासमोर नितीन कुमार पंजाबराव वाघ सध्या राहणार वाठार स्टेशन, ता. कोरेगाव हे ग्राहकांची थकीस वीज बिले भरून घेत असताना दीपक प्रसाद यांनी त्यांना फोन करून दोन दिवस थ्री फेज लाईन बंद असल्याचे सांगितले. याबाबतची तक्रार ऑफिसमध्ये जाऊन द्या असे सांगितल्याने संबंधित काम लवकर करा नाहीतर मी वायर तोडेन असे पिसाळ यांनी सांगितले. दरम्यान पिसाळ यांनी त्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलीस फौजदार शिंदे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सातारा न्यायालयातील जिल्हा सत्र न्यायाधीश पी.पी. अभंग यांच्यापुढे या खटल्याचे कामकाज सुरू होते. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आशीर्वाद कुलकर्णी यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. न्यायालयाने या गुन्ह्यात एकूण सहा साक्षीदार तपासल्यानंतर दीपक बाजीराव पोळ याला ६ महिने सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक महिना सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली.


